jansurajya

Articles

घटस्थापनेच्या मुहूर्तसाधून कोरेंचा उमेदवारी अर्ज दाखल

 

form

 

form1

 

कोल्हापूर :  स्वत:च्या घरात पदाच्या हव्यासाने तीन तीन पक्ष बाळगणारे शाहुवाडीच्या जनतेशी काय इमान राखणार अशी विरोधकांवर तोफ डागत जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे यांनी घटस्थापनेचा मुहूर्त साधत शाहुवाडी मतदार संघातून आमदार विनय कोरे यांनी मोठ्या जल्लोषी मिरवणुकीने उमेदवारी अर्ज दाखल केला. शाहुवाडीतील छ शिवाजी स्टेडियमवर यानिमित्ताने आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

शाहुवाडी पन्हाळा तालुक्यात १८३ कोटीची विकासकामे केली आहेत. सुराज्य निर्माण करण्यासाठी आणि  तालुक्याच्या विकासकामाची शिदोरी घेवून पुन्हा एकदा शाहुवाडी-पन्हाळा येथून निवडणूक लढवत  आहे. असे सांगून विनय कोरे यांनी राज्यातील महायुती आणि कॉंग्रेसच्या आघाडीमध्ये जागावाटपा बाबत चाललेल्या घोळावर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्र ही राष्ट्रपुरुषांची आणि संतांची भूमी आहे. या ठिकाणी सत्तेसाठी चाललेला हा घोळ जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. हे राज्याचे दुर्दैव आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. जनसुराज्य शक्ती कोल्हापुरातूनचार जागा लढवणार असल्याचे कोरे यांनी सांगितले. आज (गुरुवार) २५ रोजी कोरे यांनी ११.३० वाजता हजारो कार्यकर्त्यांच्या समुदायासह शक्तीप्रदर्शनकरत शाहुवाडी तहसीलदर कार्यालय येथे आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला. जनसुराज्य पक्षाकडून करवीर मधून राजू सूर्यवंशी तर हातकणंगले येथून माजी आमदार राजीव आवळे यांची उमेदवारी निश्चित झाली असून उर्वरित दुसरी यादी  तातडीने जाहीर करण्यात येणार असून  दोन दिवसात सर्व उमेदवार फॉर्म भरणार असल्याचे कोरे यांनी सांगितले. आज या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शाहुवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश केला त्या सर्व कार्यकर्त्यांचे कोरे यांच्या हस्ते सत्कार करून पक्षात स्वागत करण्यात आले.

आजच्या मेळाव्यात विनय कोरे यांचे सोबत वारणा बँकेचे अध्यक्ष निपुंणराव कोरे, माजी आमदार राजीव आवळे, सर्जेराव पाटील (पेरीडकर) भगवानराव सरनोबत, प्रा. जयंत पाटील, दिलीपराव पाटील, शोभा मिरजकर,नामदेवराव खोत, सर्जेराव पाटील (पोर्लेकर) शारदा डोंगरे,तुकाराम कांबळे, सुरेश पाटील, विजयश्री पाटील,आदि मान्यवर उपस्थित होते. 

 

मा. श्री. विनय कोरे (सावकर)

savkar

संस्थापक अध्यक्ष जनसुराज्य शक्ती पक्ष - वारणा उद्योग समूहाचे माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वोच्च दरडोई उत्त्पन्न असणारा परिसर ...!

 अधिक माहिती